घरगुती वादातून पत्नीची हत्या
कासा (बातमीदार) ः घरगुती वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार डहाणू तालुक्यातील निकणे (हाडळपाडा) येथे घडला आहे. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अलका मेढाचा पती संजय मेढासोबत घरगुती कारणांवरून वारंवार वाद होते. शुक्रवारी (ता. ६) सकाळी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजयने पत्नी अलकाला लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली. मारहाणीत तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणात मृत महिलेचा भाऊ अजय तांबडाच्या (रा. रणकोळ, शेलकीपाडा) फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.