मुंबई

विद्युत खांबाची रस्त्यालगत उभारणी

CD

वाडा, ता. ८ (बातमीदार) ः भिवंडी- वाडा- मनोर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामावेळी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेलाच विजेचे खांब उभारल्याने अपघातांचा धोका आहे. या प्रकाराची चौकशीची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भिवंडी- वाडा- मनोर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावरील जुने विजेचे खांब बदलण्यात येत आहेत. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे; मात्र संबंधित खांब रस्त्यालगतच उभारत आहे. काही खांब तर गटारावर उभारण्यात आले आहेत. नियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर खांब उभारणे गरजेचे होते; पण रस्त्यालगतच खांब उभारल्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरणावेळी पुन्हा पैसे खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी तक्रारीत केली आहे. यासंदर्भात ईगल कंपनीचे व्यवस्थापक दिनेशकुमार सिंग यांच्याशी संपर्क साधला असता १५ मीटर अंतरापर्यंत शासनाची जागा नसल्यामुळे रस्त्यालगत काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT