मुंबई

डोंबिवलीत ९ हजार १११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन

CD

९ हजार १११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन
सांगलीचा विक्रम मोडत डोंबिवलीत नवा जागतिक विक्रम स्थापित
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ ः जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीत तब्बल नऊ हजार १११ महिला व विद्यार्थीनींनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादन करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. सांगलीच्या नावावर असलेला सात हजार ३३८ महिलांच्या सहभागाचा विक्रम मोडला आहे. यामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ८) डोंबिवलीतील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल येथे या सामूहिक लेझीम वादनाचे आयोजन केले होते. ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या. लेझीम हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून तो जपण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्याचे आवाहन केले असून त्याच प्रेरणेने महिलांनी व विद्यार्थीनींनी एकत्र येत हा अनोखा विक्रम घडवला, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांनी विक्रमाचा जल्लोषात आनंद साजरा केला. पहाटेपासूनच या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विक्रमाची घोषणा होताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

साडेपाच मिनिटे विविध प्रात्यक्षिके
सुमारे साडेपाच मिनिटे विविध प्रात्यक्षिके सादर करत नऊ हजार १११ महिलांनी एकाच वेळी लेझीम वादन केले आणि जागतिक विक्रम नोंदवला. यापूर्वी सांगली येथे ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन हा विक्रम केला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी डोंबिवलीत हा नवा विक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा केली. यावेळी डांगरेकर यांनी रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांच्याकडे जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र व पदक सुपूर्द केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत काँग्रेसची पदयात्रा; शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर आंदोलन

पतीचे विवाहबाह्य संबंध, मानसिक त्रास अन् छळ; डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या भावाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT