छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान
रायगड जिल्ह्यात १११ शिबिरांचे आयोजन
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण १११ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती किशन जावळे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांचे तत्काळ निराकरण करणे हा आहे. यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अभिलेख हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, अकृषक परवानगी मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणे व गाव दप्तर अद्ययावत करणे या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
हे अभियान मार्च ते मे या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके व तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार उपस्थित होते.
चौकट :
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल
तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतकरी व आदिवासी बांधवांना महसूल सेवांचा लाभ सुलभपणे मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.