मुंबई

लाडक्या बहिणींना उद्योजिका बनवणार

CD

लाडक्या बहिणींना उद्योजिका बनवणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या विविध योजनांशी जोडून लाडक्या बहिणींना उद्योजिका बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तन येथे दिली.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘विकसित भारत, नारी शक्ती संगम’ या दोनदिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्‍घाटन रविवारी (ता. ८) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ‘राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुंबई बॅंकेच्या मदतीने सुमारे साडेसहा हजार लाडक्या महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी हमी म्हणून लाडकी बहीण योजना असून योजनेतून मिळणारे पैसे कर्जाचे हप्ते म्हणून भरले जाणार आहेत. त्यामुळे या साडेसहा हजार महिला केवळ लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत नाहीत तर त्या आता उद्योजिका झाल्या आहेत. याच धर्तीवर सर्व लाडक्या बहिणींना आर्थिक गुंतवणूक व खर्च यासंदर्भातले प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजिका बनविण्यात येणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेत भर पडणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या वेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, सदस्या रेखाताई महाजन, महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, पोपटराव पवार आदी उपस्थित होते. या परिषदेत देशभरातील व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० महिला सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभव त्यांनी परिषदेत कथन केले.


अर्थव्यवस्थेची भरारी
जगातील सर्व विकसित देशांनी त्या-त्या काळात महिला केंद्रित धोरणे आखली, महिलांनी अर्थव्यवस्थेत योगदान दिले. त्यानंतर या देशांची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘विकसित भारत’ या संकल्पनेअंतर्गत सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवस्थेची दिशा व सर्व योजना महिला केंद्रित करण्याचे काम केले. त्याचा परिणाम म्हणून २०१४ मध्ये अकराव्या स्थानावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज चौथ्या स्थानावर आली व लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या सगळ्यांच्या पाठीशी महिलाकेंद्रित धोरणे आपल्याला पाहायला मिळतात. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ने झालेली सुरुवात आज ‘लखपती दीदी’पर्यंत येऊन पोहोचली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.


२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ३३ टक्के महिला खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. त्यामुळे देशाची वाटचाल महिलाकेंद्रित लोकशाहीकडे होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील महिला सक्षमपणे काम करू लागल्या आहेत. संधी मिळाली की नेतृत्व गुण तयार होतात, त्यासाठी संधी मिळणे महत्त्वाचे असते, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.


...
५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट
राज्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून आज जवळपास दोन ते अडीच कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यातल्या नव्वद टक्के सक्रिय असून कोणत्यातरी व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. राज्य सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. त्यातून गेल्या दीड वर्षांच्या काळात सुमारे ३७ लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या असून यावर्षी ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवायचे आहे व त्यात महिला लोकप्रतिनिधींची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर वेगाने हे काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळी

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT