दापचारी कृषी कार्यालयात धोका
इमारत जीर्णावस्थेत; अपघाताची शक्यता
तलासरी, ता. ९ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील दापचारी येथे असलेले कृषी विभागाचे कार्यालय जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे काम करणारे कर्मचारी तसेच शेतकरी यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
दापचारी येथील कृषी अधिकारी कार्यालय, कृषी चिकित्सालय, राज्यस्तरीय मध्यवर्ती फळरोपवाटिका केंद्रासाठी १९८२ मध्ये ही इमारत उभारण्यात आली होती. जवळपास चार दशकांचा कालावधी उलटल्यानंतर भिंतींना तडे गेले आहेत. तसेच छतावरील सिमेंट पत्रे तुटलेल्या, जीर्णावस्थेत इमारतीची रचना कमकुवत झाली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणारे नागरिक, कर्मचारी भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. विशेष म्हणजे, दापचारी येथील राज्यस्तरीय फळरोपवाटिका केंद्रात परिसरातील तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी फळरोपे खरेदी करण्यासाठी येत असतात. तसेच रोपवाटिकेची पाहणी करण्यासाठीही नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------------------------------
दापचारी येथील राज्यस्तरीय फळरोपवाटिका केंद्रात आम्ही शेतकरी मोठ्या संख्येने रोपे खरेदीसाठी येतो. मात्र, इमारतीची अवस्था पाहता भीती वाटते. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा.
- सूरज तुंबडा, शेतकरी
--------------------------
आढावा बैठकीत वरिष्ठांकडे कळवण्यात आले आहे. लवकरच इमारतीच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
- सचिन घोलप, कृषी अधिकारी, दापचरी-तलासरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.