मुंबई

मोहिते शिक्षण संकुलात महिला दिनी महिलांचा सन्मान

CD

मोहिते शिक्षण संकुलात महिलांचा सन्मान

मोखाडा, ता. ९ ( बातमीदार) ः गिरीवासी सेवा मंडळ संस्थेच्या शिक्षण संकुलात कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करून गौरव करण्यात आला. या वेळी बारावी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलिस व होमगार्ड यांच्या कार्याचाही सन्मान करण्यात आला.
‘यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’, या पुरुषप्रधान संस्कृतीप्रिय वाक्‍याला मागे टाकत, अनेक स्त्रिया या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत. अशाच विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या असंख्य महिलांचा रविवारी (ता. ८) महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. जगभरात महिला दिन हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात असून, प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व असल्याचे मत शिक्षण विस्तार अधिकारी भरत गारे यांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा. दीपक कडलग, खजिनदार भास्कर खोळंबे, सदस्य प्रदीप मोहिते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲड. नुपूर पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवर्तन काशीद, उपप्राचार्य यशवंत शिद, उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. माधुरी अहिरे, प्रा. मयुरी नागवंशी, प्रा. नितेश कोरडा, प्रा. नरेश महाले, प्रा. ऋषिकेश कोकाटे, मुख्याध्यापक उत्तम ठवरे, सिद्धार्थ मोहिते, संजय भरीत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT