मुंबई

मुंब्रा गोळीबारानंतर अवैध शस्त्रसाठ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

CD

मुंब्रा गोळीबारानंतर अवैध शस्त्रसाठ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
मागील दोन वर्षांत अग्निशस्त्रांचे १७४ गुन्हे; २३६ आरोपी जेरबंद, मोठा मुद्देमाल जप्त
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा भागात गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध अग्निशस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पाच परिमंडळांमध्ये गेल्या दोन वर्षांत नोंदवलेल्या शस्त्रसंबंधित गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते.
मागील दोन वर्षांत अग्निशस्त्रांशी संबंधित एकूण १७४ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई करत तब्बल २३६ आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या कारवायांत सात रिव्हॉल्व्हर, १४७ पिस्टल, ५५ गावठी कट्टे, १३ गन, १३ मॅगझीन, ३१६ जिवंत काडतुसे आणि २९२ गावठी बॉम्ब, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय तलवार, चाकू, कोयते यांसारख्या इतर शस्त्रांच्या वापराशी संबंधित ९१० गुन्हे दाखल केले असून, त्यात ८३५ जणांना अटक करण्यात आली आहे.

परराज्यातून शस्त्रांची तस्करी
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांवर काही प्रमाणात अंकुश बसल्याचे चित्र असले तरी अवैध शस्त्रांचा पुरवठा हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. तपासादरम्यान जप्त केलेल्या अनेक अग्नीशस्त्रांचा उगम राज्याबाहेरील असल्याचे समोर आले आहे. विशेषतः मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून अवैध मार्गाने शस्त्रांची तस्करी करून ती ठाणे जिल्ह्यात आणली जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर परिसरात बाहेरील राज्यांतून होणाऱ्या अवैध शस्त्रपुरवठ्यावर आळा घालणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिसांचा ॲक्शन प्लॅन
मुंब्रा परिसरात घडलेल्या अलीकडील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. संशयितांवर विशेष लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीमही राबवली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अग्निशस्त्रांवर कारवाई
वर्ष गुन्हे उघड टक्के आरोपी मुद्देमाल
२०२५ ०६१ ०६१ १०० ७२ २८,५१,८१५
२०२४ ११३ ११२ ९९.९१ १६४ ५५,७८,३३६

इतर शस्त्र तक्ता
वर्ष गुन्हे उघड अटक टक्केवारी
२०२५ ३९३ ३९३ ३५० १००
२०२४ ५१७ ५१७ ४८५ १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT