मुंबई

‘धरण हटवा, शेतकरी वाचवा!’

CD

पोशीर प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक
१७ मार्चला प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा
कर्जत, ता. ९ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पोशीर धरण प्रकल्पावरून वातावरण आता तापू लागले आहे. या प्रकल्पामुळे अनेक गावे व शेतजमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवत स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. पोशीर प्रकल्प संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली येत्या १७ मार्च रोजी कर्जत प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बदलापूर, अंबरनाथ, नवी मुंबई, ठाणे व मुंबई या महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करण्यासाठी कर्जत तालुक्यात पोशीर व शिलार धरण प्रस्तावित केले आहे. मात्र, या प्रकल्पाचा स्थानिकांना कोणताही फायदा होणार नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. यापूर्वी उभारलेल्या धरणांमुळेही स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्याने धरण नको, अशी ठाम भूमिका येथील शेतकरी व भूमिपुत्रांनी घेतली आहे.
पोशीर नदीकिनारी उभारणाऱ्या या धरणामुळे बोरगाव, कुरुंग, उंबरखांड, भवानीपाडा, बोन्डेशेत, पेंढरी, भोपळेवाडी, चई, चेवणे, चाफेवाडी आणि खांडस या गावांमधील मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोशीर प्रकल्प संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आली. या समितीच्या वतीने १७ मार्च रोजी कर्जत प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार तसेच पोलिस प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. १७ मार्च रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

धरण हटवा, शेतकरी वाचवा मोहीम
समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे. आमची जमीन आम्ही कदापि देणार नाही. प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. या आंदोलनात गावागावातील तरुणवर्गही मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. तरुणांनी गावोगावी जाऊन प्रकल्पाचे दुष्परिणाम समजावून सांगत जनजागृती सुरू केली असून ‘धरण हटवा, शेतकरी वाचवा’ ही मोहीम तालुक्यात जोरात राबवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT