महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात दोन अल्पवयीन मुली गायब
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या कोलशेत रोड परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याचदरम्यान एका ११ वर्षीय बालकाचेही अपहरण झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ७) सकाळी सुमारे पावणेसात वाजण्याच्या सुमारास १६ वर्षीय मुलगी आणि तिची मैत्रीण अशा दोघी कोलशेत रोड येथून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्या दोघींना कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी प्रलोभन दाखवून, फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तर दुसऱ्या घटनेत, वागळे इस्टेट परिसरात राहणारा ११ वर्षीय मुलगा मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी जातो सांगून शुक्रवारी (ता. ६) घराबाहेर पडला. तो घरी रात्री उशिरापर्यंत आला नाही. म्हणून त्याच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाइकांकडे चौकशी करून शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही. त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अखेर श्रीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.