मुंबई

पाणीपुरवठा माहितीचा डिजिटल मार्ग

CD

उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या वतीने नगरसेवकांना पाणीपुरवठ्याविषयीची माहिती वेळेत, अचूक आणि अधिकृत पद्धतीने मिळावी, यासाठी विशेष व्हॉट्सॲप डिजिटल प्रसारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून ही प्रणाली कार्यान्वित केली असून, शहरातील ७८ नगरसेवकांना याचा लाभ होणार आहे.
या प्रणालीद्वारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, नियोजित दुरुस्ती कामे, आपत्कालीन सूचना, क्षेत्रनिहाय पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच इतर महत्त्वपूर्ण सूचना सर्व नोंदणीकृत नगरसेवकांना व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टच्या माध्यमातून एकाच वेळी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी ८४५४०७९७९३ हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. याच क्रमांकावरून सर्व अधिकृत संदेश प्रसारित केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांपर्यंत पाणीपुरवठ्याबाबतची माहिती तत्काळ पोहोचविणे सोपे होणार आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्याबाबतची अद्ययावत माहिती नगरसेवकांना थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
ही प्रणाली अनौपचारिक संदेश पद्धतीऐवजी सुरक्षित, संरचित आणि दस्तऐवजीकरण केलेल्या अधिकृत प्रशासकीय माध्यमातून संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस तसेच उपायुक्त अनंत जवादवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले आणि उपअभियंता दीपक ढोले या प्रणालीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये
१. डिजिटल प्रसारण प्रणालीद्वारे सर्व नगरसेवकांना एकाच वेळी सूचना व नोटिसा पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच पीडीएफ स्वरूपातील अधिकृत आदेश आणि परिपत्रके पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.
२. प्रत्येक संदेशाची स्वयंचलित डिजिटल नोंदवही भविष्यातील संदर्भासाठी उपलब्ध राहणार आहे.
३. एकमार्गी प्रसारण प्रणाली असल्यामुळे अनावश्यक गटचर्चा टाळली जाईल आणि संदेशावर लक्ष केंद्रित राहणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या डिजिटल उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेली ही प्रणाली पारदर्शकता, कार्यक्षमता आणि माहिती वितरणाची गती वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून नागरिकांना वेळेत आणि अचूक सेवा देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT