मुंबई

महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

CD

महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर
चेंबूर, ता. ११ : जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) राष्ट्रसेवा मुंबई दलातर्फे महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायन किल्ला परिसरात आयोजित या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या समस्या तसेच जीवनातील विविध अडचणींवर कशाप्रकारे मात करावी, याबाबत या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ॲड. निर्मला कु-हे, डॉ. लेखिका सनम शेख आणि हाफकिन इन्स्टिट्यूटमधील मानसी शिंदे यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लाफ्टर क्लब, योगा ग्रुप, सिंगर ग्रुप तसेच दीपिका जेस्वार आणि अरविंद एस. यांचे सहकार्य लाभले. मुंबई कार्यवाह चंद्रकांत म्हात्रे आणि स्वप्ना पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला छात्र भारती संघटनेचे नीलेश झेंडे, गायक कुमार भारती, संभाजी सोनवणे, माजी मुख्याध्यापक पांडुरंग केंगार यांच्यासह महिला व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Credit Card यूजर्ससाठी दिलासा! आता बिल उशिरा भरलं तरी लगेच दंड नाही; RBI चा नवा नियम काय?

ग्रामपंचायतींच्या निकालातून राजकीय समीकरणे बदलणार; सावनेर तालुक्यात केदार समर्थकांची सरशी; भाजपला धक्का

Pune news : टुरिस्ट व्हिसावर आले अन्... पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा, पोलिसांनी दिले देश सोडण्याचे आदेश

Aadhaar Design Change : आधार कार्डचा नवा अवतार! नाव-पत्ता गायब; फक्त फोटो अन् QR कोड, कशी आहे नवी डिझाईन? पाहा

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

SCROLL FOR NEXT