मुंबई

अर्थसंकल्पाइतकी महापालिकेची थकबाकी

CD

वसुलीअभावी थकबाकीचा डोंगर
भिवंडी पालिकेच्या विकासकामांवर परिणाम

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेची २०२६ पर्यंत ९९४.३० कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. त्यामध्ये ४१८ कोटी रुपये व्याजाचा समावेश आहे. ही थकबाकी महापालिकेच्या वार्षिक आर्थिक संकल्पाइतकी झाली आहे. महापालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता करवसुलीसाठी शहरातील रहिवाशांकडून १७५.७४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, गेल्या वर्षीच्या थकबाकी कर आणि वसुलीचा विचार करता या वेळी महापालिकेला हे लक्ष्य गाठण्यात अडचणी येणार आहेत.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी सांगितले की, करवसुलीत नागरिकांचा कमी प्रतिसाद त्यामुळे होणारी कमी वसुली ही दीर्घकाळापासून महापालिकेसाठी एक मोठी समस्या आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत फक्त २९.९६ कोटी जमा झाले. यामध्ये चालू वर्षाच्या मालमत्ता करातील १६ कोटी आणि जुन्या करातील १३ कोटींचा समावेश आहे. त्यांनी स्पष्ट केले की, महापालिका थकित मालमत्ता कर वसूल करण्यासाठी वारंवार अभय योजना जाहीर करते. त्याअंतर्गत मालमत्ताधारकांना १०० टक्के व्याजाची सवलत दिली जाते. या जाहीर योजनेनंतरही थकीत रक्कम न भरल्यास मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मालमत्ता कर विभागाचे प्रमुख सुधीर गुरव यांनी सांगितले की, वसुलीची प्रक्रिया जलद करण्यासाठी महापालिकेच्या पाचही प्रभाग समित्यांमध्ये ८० हून अधिक लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर मालमत्ता मालकांकडून २,८५,१७१ रुपये थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.

मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून करवसुलीत अपेक्षित वाढ न झाल्याने परिसरातील विकास प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. व्याजमाफी योजनांची वाट पाहत असताना मोठ्या संख्येने लोक त्यांचे कर भरणे पुढे ढकलत आहेत. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, ही योजना मर्यादित कालावधीसाठी आहे. ३१ मार्चनंतर थकबाकीदारांना व्याजदरात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. महापालिकेच्या प्रशासकीय काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत.

म्हणून थकबाकीमध्ये वाढ
काही अधिकारी व वसुली कर्मचारी यांनी माजी नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून अपेक्षित वसुली केली नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थकबाकीदारांवर वेळीच कारवाई न करता त्यांना अभय दिल्याने वसुलीचा प्रतिसाद कमी झाला आहे, तर केवळ वसुलीचे आकडे फुगविण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करीत जानेवारी ते मार्च या काळात अभय योजना अंतर्गत त्यांच्याकडून वसुली केली जाते. मात्र, वर्षभर थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी थकबाकीमध्ये वाढ होऊन यावर्षी ही थकबाकीने पालिकेच्या अर्थसंकल्पाइतका एकदा गाठला आहे.


थकबाकीदार मालमत्तांची संख्या
निवासी : २,४५,४३३
व्यावसायिक : ३९,७३८
एकूण मालमत्ता : २,८५,१७१


प्रभाग समितीनुसार थकबाकी (कोटींत)
विभाग मागील चालू वर्ष एकूण
१. २९६.९४ ५१.९५ ३४८.८९
२. १६१.६५ ३३.८१ १९५.४६
३. १४१.०३ ३५.४९ १७६.५२
४. १२४.१७ ३४.०८ १५८.२५
५. ९४.७७ २०.४१ १५.१८
.............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT