मुंबई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प

CD

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प
मिरा-भाईंदरमध्ये विहान संस्थेकडून घरोघरी सर्वेक्षण
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील विहान फाउंडेशन संस्थेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने पहिल्या टप्प्यात मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहकार्याने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
विहान संस्था पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काम करत आहे. संस्थेकडून दरवर्षी एक प्रदर्शनही भरवण्यात येते. या माध्यमातून पीओपी मूर्तींमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, पर्यावरणपूरक मूर्तींचे महत्त्व, पर्यावरणपूरक मूर्तींची सविस्तर माहिती दिली जात आहे. आता संस्थेकडून घरगुती गणेशाची स्थापना करणाऱ्या भक्तांच्या घरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात पीओपीच्या मूर्तींची माहिती, गणेशमूर्तीची स्थापना किती वर्षे केली जात आहे, गणपती किती दिवसांचा असतो, त्याचे विसर्जन कुठे केले जाते, याबाबतची माहिती गोळा केली जात आहे. या माहितीतून पीओपी मूर्ती आणणाऱ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे भाविकांना मेमध्ये होणाऱ्या प्रदर्शनात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करण्याची विनंती केली जाणार आहे. तसेच संस्थेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन पर्यावरणपूरक मूर्तीचे महत्त्व पटवून देणार आहेत.
-----------------------------
२०२९ चे उद्दीष्ट
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना ही काळाची गरज बनली आहे. याच अनुषंगाने संस्थेने २०२९ पर्यंत मिरा-भाईंदर शहर पर्यावरण पूरक गणपतींचे शहर बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याची माहिती विहानचे संस्थापक हसमुख गेहलोत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शेतकऱ्यांनी रोखला शिक्रापूर-पाबळ मार्ग; चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला कडाडून विरोध, शेती आणि पाणी संकटात येईल

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

रंगभूमी गाजवलेला गारंबीचा बापू आता रुपेरी पडद्यावर ! पोस्टरने वेधलं लक्ष

Viral Video:"‘मी का थांबावं?’ निवृत्तीच्या प्रश्नावर हरमनप्रीतचा पलटवार; चाहत्यांना आठवला धोनीचा Viral Moment"

Panhala Fort Tourism Tax : पन्हाळा गडावर पर्यटकांची मोठी कोंडी! 15 रुपये कर देऊनही 'या' एका सुविधेसाठी करावी लागतेय कसरत; पाहा काय आहे स्थिती

SCROLL FOR NEXT