टाटा पॉवरने विणला सशक्तीकरणाचा ‘अनोखा धागा’!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महिला दिनानिमित्त टाटा पॉवरने नुकतेच ‘अनोखा धागा’ या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासाचा गौरव केला. वंचित समुदायातील महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने मावळ येथील एका छोट्या शिवणकाम केंद्रापासून सुरू झाला होता. आज या उपक्रमाने महिला गटांचे शक्तिशाली आणि चैतन्यमय नेटवर्कचे रूप घेतले आहे.
मुंबईत ज्या महिला घराची जबाबदारी सांभाळून आपल्या कष्टाने आणि कौशल्याने वस्तू बनवतात त्यांना या उपक्रमात सहभागी केले जाते. या उपक्रमात त्यांना काम शिकवले जाते. तसेच वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही पुरवला जातो. यामुळे महिलांना आपल्या घरूनच सहजपणे काम करता येते. त्यांना शिकण्यासोबतच कमाईचे एक भक्कम साधनही मिळते. जे त्यांच्या आर्थिक विकासाचा आधार बनते. सुरुवातीला शिवणकामावर आधारित असलेला हा उपक्रम आता विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे.
आर्थिक स्थैर्याला बळ
भरतकाम, हस्तकला, चॉकलेट्स आणि कुकीजसारखे खाद्यपदार्थ, घरसजावटीच्या वस्तू, तसेच इतर हस्तनिर्मित उत्पादनांमध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाते. डिझाइन, सॅम्पलिंग, उत्पादन, पॅकेजिंग, किंमत निर्धारण आणि बाजारपेठेतील सहभाग अशा संपूर्ण मूल्यसाखळीतील कौशल्ये महिलांना शिकवली जातात. तसेच शिक्षण, आरोग्य गरजा आणि लघुउद्योग विकासासाठी आर्थिक सहाय्य देऊन महिलांच्या दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यालाही बळ दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.