मुंबई

आरोग्य सेविका शीला वळवी यांचा सन्मान

CD

आरोग्यसेविका शीला वळवी यांचा सन्मान

कासा (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट आरोग्यसेविका शीला भगवान वळवी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. रविवारी (ता. ८) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. ग्रामीण भागात मातृ-शिशू आरोग्यसेवेत उल्लेखनीय कार्य करताना शीला वळवी यांनी सर्वाधिक नॉर्मल डिलिव्हरी करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील माता व बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्यसेविका वळवी यांनी सातत्याने परिश्रम घेतले असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी मार्गदर्शन व पाठबळ देणाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या अशा आरोग्यसेविकांमुळे मातृ-शिशू आरोग्यसेवा अधिक बळकट होत असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Culture Board Game: दादरच्या साहिलराजे शिर्केचा ‘मुमुक्षू’ देशभर गाजतोय; भारतीय जीवनमूल्यांवर आधारित बोर्ड गेम मोबाईलला टक्कर

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रद्द; उद्या पुन्हा होणार मतदान, कारण काय?

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Petrol and Diesel: खिशाला जबरदस्त फटका बसणार! पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार? केंद्र सरकारने दिले स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT