मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रद्द; उद्या पुन्हा होणार मतदान, कारण काय?

West Bengal Repoll News 2026 : या १५ पोलिंग स्टेशनवर २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. मात्र, काही कारणांमुळे हे मतदान रद्द करण्यात आले आहे. |
West Bengal Repoll News 2026

West Bengal Repoll News 2026

esakal

Updated on

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येथील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर उद्या पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. यात मगराहाट पश्चिम मतदारसंघातील ११ आणि डायमंड हार्बरमधील ४ मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आय़ोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत याठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com