मुंबई

गिरणी कामगारांचे घराच्या हक्कासाठी आझाद मैदानावर आंदोलन

CD

गिरणी कामगारांचे आंदोलन
घराच्या हक्कासाठी आझाद मैदानावर एल्गार

मुंबई, ता. १० : रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर हजारो गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी आझाद मैदान येथे सरकारविरोधात आंदोलन केले. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात कामगारांनी “घर नाही कुणाच्या बापाचे, ते आमच्या हक्काचे”, “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुंबईतच घर मिळाले पाहिजे, शेलू-वांगणी किंवा इतर ठिकाणचे पर्याय स्वीकारणार नाही, अशी भूमिका कामगारांनी स्पष्ट केली. समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले की, “जोपर्यंत रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. विधान भवन आणि मैदान या दोन्ही ठिकाणी हा लढा नेटाने लढविला जाईल.” स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांना घराच्या हक्कापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, सरकारने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर निर्णय घेतला नाही, तर सभागृह चालू देणार नाही, तर ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या प्रश्नावर सभागृहात सरकारवर दबाव आणला जाईल, असे सांगितले. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारची इच्छाशक्ती असेल, तर हा प्रश्न तातडीने सुटू शकतो, असे मत व्यक्त केले.
या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मागील सरकारमध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता होती. मात्र, सध्याच्या सरकारकडे गरीब कामगारांविषयी संवेदनशीलता दिसत नाही, तर समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी राज्यभर सभा घेत कामगारांना एकत्र केले. त्यामुळे आजचे आंदोलन ऐतिहासिक ठरल्याचा विश्वास व्यक्त केला. या आंदोलनाला विविध संघटना व नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. कामगार नेते कॉ. मिलिंद रानडे, सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कॉ. उदय भट, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी तसेच इतर कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT