

Rajasthan Royals New Owner | IPL 2026
Sakal
Rajasthan Royals Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा एकिकडे सुरू आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स चांगल्या लयीत खेळतही आहे. पण दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचे मालकी हक्कच बदलले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजस्थान रॉयल्सच्या संघाची मालकी बदलण्याची चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी मित्तल (Lakshmi Mittal) आणि सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे मालक आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी मिळून या फ्रँचायझीचा मोठा हिस्सा विकत घेतला आहे. या दोघांकडे मिळून ९३ टक्के मालकी हक्क आहे. त्यामुळे हे दोघे राजस्थान रॉयल्सचे नवे मालक म्हणूनही ओळखले जातील. त्यांच्यासोबतच सध्याचे राजस्थानचे सहमालक असणारे मनोज बदाले (Manoj Badale) देखील आहेत.