अंगणवाडी सेविका ते सुवर्णकन्या!
पॉवरलिफ्टर सरिता कदम यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : रशिया येथे झालेल्या ‘वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून देशाची मान उंचावणाऱ्या नेहरू नगर येथील अंगणवाडी सेविका सरिता कदम यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘सक्षम महिला, सशक्त महिला’ कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरिता कदम यांनी अंगणवाडी सेविकेची जबाबदारी सांभाळतानाच पॉवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश हे राज्यातील महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्यासह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बालगृह, अनाथ आरक्षण, महिला वसतिगृह आणि शक्ती सदनमधील विविध लाभार्थी तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचाही प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक सोहळा
सोहळ्यानिमित्त विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण झाले. कार्यक्रमाला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह अधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.