मुंबई

भिवंडीत ‘स्पेस’वर जागतिक विचारमंथन

CD

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बी. एन. एन. महाविद्यालयात सोमवारी (ता. ९) ‘स्पेस : एसीई, प्लेस, पेस’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषद घेण्यात आली. परिषदेला देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या परिषदेत ग्रीस सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील ग्लोबल अकॅडमीशियन डॉ. रानिया लँपौ यांनी विज्ञान आणि समाजजीवनातील अवकाश (स्पेस) या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रांमुळे भविष्याचा आकार बदलत आहे. अंतराळ तंत्रज्ञानामुळे दळणवळण आणि संदेशवहन क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे डॉ. लँपौ त्यांनी सांगितले. तसेच ‘शक्तीसॅट’ उपग्रहामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी संस्था कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉ. किन्नरी ठक्कर, तसेच आयसीटी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. आर. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय अवकाश संशोधनातील प्रगती, विशेषतः इस्रो आणि चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी पीएच.डी. पदवी व मार्गदर्शक पद प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
परिषदेचे उद्‍घाटन अध्यक्ष डॉ. विजय जाधव आणि कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने केले. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब पगारे, प्रा. प्रियंका ठाकूर, प्रा. नीलम सेन, प्रा. तंझील नाचण आणि प्रा. राजेश देसले यांनी केले. परिषदेच्या समारोप सत्रात मान्यवरांनी संशोधनपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत अशा परिषदांमुळे ज्ञानवृद्धी आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढीस लागते, असे मत व्यक्त केले.

पुढील वर्षी ‘अग्नी’ विषय
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पंचमहाभूतांवर आधारित या आंतरराष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी ‘जल’ या विषयावर परिषद झाली होती. यंदा ‘अवकाश’ विषयावर परिषद घेतली असून, पुढील वर्षी ‘अग्नी’ विषयावर परिषद होणार आहे.

संशोधनपर निबंध
परिषदेत विविध विषयांवरील संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. सुमारे ४०० पेक्षा अधिक संशोधन निबंधांची नोंदणी करण्यात आली होती, त्यापैकी ३२५ निबंधांचे विविध तांत्रिक सत्रांमध्ये सादरीकरण झाले.

भिवंडी : ‘स्पेस’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत देश-विदेशातील संशोधक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT