मुंबई

वसईतील शेतकऱ्यांचे मुंबईत स्वागत

CD

वसईतील शेतकऱ्यांचे मुंबईत स्वागत
सहकार्य करण्याचे महापौर रितू तावडे यांचे आश्वासन

विरार, ता. ११ (बातमीदार) ः वसई तालुक्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना दादर येथील बाजारपेठेत पहाटेच्या वेळी फुलांच्या विक्रीसाठी पालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आमदार राजन नाईक यांना दिले आहे.
वसई तालुक्यातील स्थानिक फूल उत्पादक ५० वर्षांपासून दादर येथील बाजारपेठेत फुले विक्रीसाठी नेत आहेत. वसईतील सोनचाफा, जास्वंद, तगर, मोगरा, सायली अशा फुलांना मुंबईकरांकडून मागणी आहे. वसईतील घाऊक व्यापाऱ्यांपेक्षा दादर येथील फूल बाजारपेठेत भाव मिळत असल्यामुळे छोटे शेतकरीही दादर येथे पहाटेच्या सुमारास फुले विक्रीसाठी आणतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबई पालिकेने विशेष अभियान सुरू केल्याने फूलविक्रेत्यांना मज्जाव केला जात होता. त्यामुळे एकीकडे कृत्रिम फुलांच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या कारवाईमुळे उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उद्भवला आहे.
--------------------------------
पहाटेच फुलांची विक्री
वसई तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार राजन नाईक यांना निवेदन दिले. मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईकडे निवदेनात लक्ष वेधले होते. तसेच पहाटे ४.३० ते सकाळी ७.३०पर्यंत फुलांची विक्री होत असल्यामुळे कोंडी होणार नसल्याकडे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

IND vs IRE, T20I: पोरं तर पोरं, आयर्लंडच्या पोरींनी पण भारताला हरवल्याचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; Video Viral

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Tilari National Park : कोकणचे 'अ‍ॅमेझॉन' आता बदलणार! सिंधुदुर्गात होणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य नॅशनल पार्क, जाणून घ्या सरकारचा मेगा प्लॅन?

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT