मुंबई

घाटकोपरसह उपनगरांत छोटे हॉटेल अडचणीत

CD

घाटकोपरसह उपनगरांत लहान हॉटेल्स अडचणीत
गॅस सिलिंडर टंचाईमुळे व्यवसाय ठप्प; कामगारांवर बेरोजगारीची भीती
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा मोठा फटका मुंबईसह राज्यातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक घाटकोपरसह उपनगरांतील अनेक लहान हॉटेल्स, उपाहारगृहे आणि चहाच्या टपऱ्या बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्याने घाटकोपरसह पूर्व उपनगरातील अनेक छोटी हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. गॅसशिवाय स्वयंपाक करणे शक्य नसल्यामुळे हॉटेल मालकांसमोर व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक छोटे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईप्रमाणेच नाशिक, पुणे आदी शहरांमध्येही अनेक लहान हॉटेल्सना कुलूप लागल्याची माहिती मिळत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने त्याचे दरदेखील वाढले असून, काही ठिकाणी जास्त पैसे देऊनही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
हॉटेल्स बंद ठेवावी लागत असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल्समध्ये काम करणारे स्वयंपाकी, वेटर, साफसफाई कर्मचारी यांचे रोजंदारीवर उत्पन्न चालत असल्याने त्यांच्यासमोरही आर्थिक संकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त होत आहे.

गॅस मिळत नसल्याने व्यवसाय ठप्प
याबाबत प्रतिक्रिया देताना घाटकोपर येथील आनंद हॉटेलचे मालक मुरली सितारामन म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. दर वाढले असले तरी जास्त पैसे देऊनही सिलिंडर मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर छोट्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.”

कामगारांचीही चिंता वाढली
हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारीही या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. “हॉटेल बंद राहिल्यास आमच्या रोजच्या उत्पन्नावर परिणाम होतो. घरखर्च कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया एका हॉटेल कर्मचाऱ्याने दिली. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन आणि संबंधित कंपन्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा अनेक छोटे व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : कारच्या एअरबॅगचा ब्लास्ट, चालक तरुणाचा मृत्यू

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT