मुंबई

दिघोडे चौकात वाहतूक कोंडीचा कहर

CD

दिघोडे चौकात वाहतूक कोंडीचा कहर
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या अवजड वाहनांमुळे दोन-तीन तास वाहने अडकतात
कोंडीत ॲम्बुलन्स अडकल्याने नागरिकांत संताप; प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
उरण, ता. ११ (वार्ताहर) : उरण तालुक्यातील दिघोडे चौक परिसरात अवजड ट्रेलर रस्त्यावरच पार्क केल्यामुळे आणि काही वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दिघोडे चौक ते चिरले तसेच दिघोडे चौक ते गव्हाण फाटा या मार्गांवर वाहतूक कोंडीने अक्षरशः उचांक गाठला असून, वाहनचालकांना दररोज दोन ते तीन तास रस्त्यावर अडकून राहावे लागत आहे. काल सायंकाळी तर एका ॲम्बुलन्सलाही जवळपास दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी सुमारे १२ मीटर रुंदीचा काँक्रीटीकरणाचा रस्ता तयार केला होता. चार वाहने सहजपणे जाऊ शकतील, अशी रचना असलेल्या या रस्त्याची सध्याची अवस्था मात्र विपरीत झाली आहे.
या मार्गावर उभारण्यात आलेल्या सीएफएस यार्ड तसेच रिकाम्या कंटेनरच्या अधिकृत व अनधिकृत व्यवसायांमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड ट्रेलर आणि कंटेनर वाहने उभी केली जातात. परिणामी रस्त्याच्या दोन लेन अक्षरशः पार्किंगसाठीच वापरल्या जात असून, प्रत्यक्षात प्रवासासाठी फक्त दोन लेन उरतात. एखादे वाहन बंद पडले किंवा ट्रेलर यार्डमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या की संपूर्ण वाहतूक ठप्प होते.
या सततच्या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार, विद्यार्थी, रिक्षाचालक तसेच स्थानिक नागरिकांना बसत आहे. तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून राहिल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

चौकट
अवैध ट्रेलर पार्किंगवर कारवाईची मागणी
दिघोडे चौक परिसरातील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर होणारे अवैध ट्रेलर पार्किंग असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक गोदाम मालकांनी आपल्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केलेली नसल्याने ट्रेलर थेट रस्त्यावरच उभे केले जातात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एक-एक लेन कायमस्वरूपी बंदच राहते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अवैध पार्किंगवर कडक कारवाई करणे, गोदाम मालकांना स्वतंत्र पार्किंगची सक्ती करणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT