मुंबई

महापारेषणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

CD

महापारेषणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पद्मश्री अनुराधा पौडवाल, डॉ. नीलेश व डॉ. गौरी साबळे यांच्याशी संवाद

मुंबई, ता. ११ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) आणि महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महानिर्मिती)च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने, महानिर्मितीचे मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) आनंद कोंत उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्याशी निवेदिका स्मिता गवाणकर यांनी, तर ‘चला हवा येऊ द्या’ फेम डॉ. नीलेश साबळे व डॉ. गौरी साबळे यांच्याशी निवेदक प्रशांत अनासपुरे यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना डॉ. संजीव कुमार म्हणाले, महिलांनी विविध क्षेत्रात आपले स्थान बळकट केले आहे. तसेच विकसित देशासाठी महिलांना प्रोत्साहन, आत्मविश्वास आणि ताकद देणे महत्त्वाचे आहे. आरोग्य क्षेत्राबरोबरच वीजक्षेत्रातही महिला आदर्श काम करीत आहेत. त्यांच्या कामांना पाठबळ देणे महत्त्वाचे आहे. या वेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विश्वास पाठक म्हणाले की, १९०५ मध्ये अमेरिकेत जागतिक महिला दिन सुरू झाला. २१ जून हा योगदिन म्हणून भारताने सुरू केला. आता सर्वच क्षेत्रात महिलांचा पुढाकार आहे, हे कौतुकास्पद आहे. अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी यांनी इंग्रज, मुघलांसोबत लढाई केली. तसेच संस्कृतीसाठी मोठा लढा उभारला. संस्कारक्षम कुटुंब, समाज आणि देश उभारणीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कविता महाजन आणि रिता सुकलकर यांनी केले. महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------
स्वदेशी उत्पादनांची मोठी विक्री
याप्रसंगी महिलांनी बनविलेल्या व विक्रीस ठेवलेल्या स्वदेशी उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. महिलांना सक्षम करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांनी पुढाकार घेतला. यामध्ये घरगुती पदार्थ, डाळी, विविध उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT