भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : दररोज विविध खाद्यपदार्थांवर ताव मारणारे रोजेकार चिंतीत झाले आहेत. वास्तविक रमजान महिन्यात भिवंडीतील मांसाहारी हॉटेलमध्ये मुस्लिमधर्मीय रोजा (उपवास) करणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हॉटेलचालकांना रमझानच्या काळात मोठे उत्पन्न मिळते. मात्र, गॅस मिळत नसल्याने खाद्यपदार्थ बनविणारे व्यावसायिक चिंतीत झाले आहे.
काही दिवसांपासून हॉटेल व्यवसाय आणि खाद्यपदार्थांचे छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. खासकरून स्थानिक मांसाहारी हॉटेल व्यावसायिक रमजान महिन्यात विविध खाद्यपदार्थ व चविष्ट व्यंजने करून रोजेकारांना आकर्षित करीत असतात. शीग कबाब, फिरनी, मालपोआ, चिकन कबाब, तंदुरी चिकन आदी खाद्यपदार्थ या चटोरगल्लीत उपलब्ध असतात. त्यामुळे शहरातील खवय्ये विविध ठिकाणी असलेल्या चटोरगल्लीमध्ये गर्दी करीत असतात. सायंकाळपासून सुरू झालेल्या गर्दीमुळे रमजान महिन्यात रात्री उशिरापर्यंत हा व्यवसाय अव्याहतपणे सुरू असतो. अशा व्यावसायिकांकडे आणि काही हॉटेल चालकांकडे सध्या काही दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायाबाबत चिंता निर्माण झाली आहे. दरवर्षी रमजान महिन्यात भिवंडी आणि परिसरातील मांसाहारी हॉटेलचालकांचा मोठा धंदा असतो. या दरम्यान काही जण वर्षभराची कमाई या महिन्यात करतात.
खानावळी परिणाम नाही
यंत्रमाग कारखान्यातील हजारो कामगारांना दररोज दोन वेळचे नियमित जेवण देणाऱ्या शहरात सुमारे २००पेक्षा जास्त खानावळी आहेत. त्यामधून त्यांच्यावर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. कारण त्यांचे संपूर्ण जेवण हे चुलीवर व भट्ट्यांवर शिजते. शहरातील छोट्या हॉटेलधारकांकडे शेगडी नसल्याने त्यांचा व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. काही धाब्यांवर नियमित चुलीवर जेवण शिजविले जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेले नाही.
चुलीवरचे जेवण देण्याचा प्रयत्न
भिवंडी शहराबाहेर मोठ्या संख्येने ढाबे असून, व्यावसायिक गॅस टंचाईने त्यांचा व्यवसायही अडचणीत आला आहे. आता चुलीवरचे जेवण देण्याचा प्रयत्न काही ढाबेचालकांनी सुरू केला आहे. मात्र, नियमित चुलीवर जेवण शिजविण्याची सवय नसल्याने हे काम अडचणीचे ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.