स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे तत्काळ भरा
आमदार सुलभा गायकवाड यांची विधानसभेत आग्रही मागणी
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कारभार सक्षम करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आग्रही मागणी आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभा अधिवेशनात केली. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विकासकामांचा वेग मंदावला असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
अधिवेशनात आमदार गायकवाड म्हणाल्या की, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत, मात्र त्यांच्या मदतीसाठी आवश्यक कर्मचारीवर्ग अपुरा आहे. एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन विभागांचा कार्यभार असल्याने निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. कर्मचारी टंचाईमुळे कामाचा ताण इतका वाढला आहे की, अनेक कर्मचारी मानसिक दडपणाखाली आहेत. काही ठिकाणी तर अतिताणामुळे कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावल्याच्या गंभीर घटना घडल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा वाढता व्याप पाहता, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नवीन ‘आकृतीबंध’ तयार करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने यावर ठोस उपाययोजना करून प्रशासकीय यंत्रणा सक्षम करावी, असेही त्यांनी सुचवले.
निवृत्तिवेतनाचा प्रश्न
आमदार गायकवाड यांनी केडीएमसीशी संबंधित इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. केडीएमसीमध्ये समाविष्ट २७ गावांतील कर्मचाऱ्यांना अद्याप महापालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आलेले नाही, ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ग्रॅच्युइटी मिळण्यास होणारा विलंब थांबवावा. निवृत्तिवेतनात वाढ करून ते किमान २५ हजार रुपये करावे, राज्यातील सर्व रिक्त प्रशासकीय पदे तातडीने भरण्यात यावीत, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवीन ‘आकृतीबंध’ तयार करावा, २७ गावांतील कर्मचाऱ्यांचे महापालिकेत विलीनीकरण करावे, अशाही मागण्या केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.