मुंबई

सायबर तक्रारींकडे दुर्लक्ष

CD

सायबर तक्रारींकडे दुर्लक्ष
विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांचा आरोप; राज्यात ‘महा सायबर सेफ’ ॲप लवकरच
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : राज्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकदा नागरिकांच्या तक्रारी नोंदविताना पोलिसांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची बाब विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली. ऑनलाइन गेमिंग आणि सायबर फसवणुकीमुळे मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर पनवेल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पी चर्चेदरम्यान सविस्तर भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्राधिकरण, सिडको, पाणीपुरवठा, बस स्थानक तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले.
अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान बोलताना ठाकूर यांनी सांगितले की, अनेक वेळा सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत किंवा तपास प्रक्रियेला विलंब होतो. २०२४ व २०२५ या कालावधीत ऑनलाइन गेमिंगसंदर्भात राज्यात १२० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील सायबर कार्यालयांमध्ये २६ तज्ज्ञ सल्लागार कार्यरत असून, सुमारे एक हजार पोलिस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक तक्रारी नोंदवल्या जात नसल्याची शक्यता असल्याने अधिक प्रभावी नोंद व तपासासाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून त्याचे सातत्याने पुनरावलोकन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्यात सायबर सेलची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. महापे येथे देशातील सर्वात मोठे सायबर केंद्र उभारण्यात आले असून, राज्यात ५० सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, डार्क वेब, डिजिटल फसवणूक आणि खात्यांतील रक्कम गोठविणे यांसारख्या बाबींवर कारवाईसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृतीसाठी राज्य सरकारने सुमारे ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, दरमहा सुमारे २१ कोटी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. तसेच ‘महा सायबर सेफ’ हे ॲप लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे सायबर फसवणुकीची माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

चौकट :
पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर
• वाहतूक व विकास प्रकल्प :
पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, पनवेल-वसई कॉरिडॉर, मेट्रोमार्ग तसेच सागरी व रस्ते प्रकल्पांमुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. एज्यु सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटीसारखी नवी विकास केंद्रेही या भागात उभारली जात आहेत. पनवेल परिसरात उभारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबर २०२५ पासून कार्यान्वित होणार असून, त्यामुळे परिसराच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे

• नागरी सुविधा व पायाभूत विकास :
सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसी आणि नैना या प्राधिकरणांमध्ये समन्वय साधून पाणीपुरवठा, पनवेल बस स्थानकाचा पुनर्विकास, भूमिगत विद्युत केबल प्रकल्प तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Case: ''वाल्मिक कराडच्या बंगल्यातून अजूनही सूत्र हलतात, धनंजय मुंडेंचा संबंध नाही'', ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्पष्ट सांगून टाकलं

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

SCROLL FOR NEXT