मुंबई

कवी साहेबराव धनवटे यांच्या कवितांनी एनएसएस स्वयंसेवक मंत्रमुग्ध

CD

श्रमसंस्कार शिबिरात धनवटेंच्या कवितांनी स्वयंसेवक मंत्रमुग्ध

वाणगाव, ता. १४ (बातमीदार) : मुंबई येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस)वतीने शुक्रवारी (ता. १३) श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. या वेळी ठाकूरपाडा (माणुकसर, सफाळे) येथे सुरू असलेल्या शिबिराच्या संध्याकाळच्या सत्रात कवी साहेबराव धनवटे यांचा ‘जावे कवितेच्या गावा’ या विशेष काव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धनवटे यांच्या कविता वाचनाने एनएसएसचे स्वयंसेवक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमात कवी धनवटे यांनी आपल्या कवितांमधून प्रेम, निसर्ग आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी दर्शन घडविले. ‘प्रेम पिंपळाच बीज गं, त्याचं कळत नाही गूज गं, नाही संभव खडकावरी, तेथे फुटतो अंकुर गं’ या ओळींमधून प्रेमाची अद्भुत शक्ती उलगडून सांगताना त्यांनी श्रोत्यांना विचारमग्न केले. ‘धरित्रीने दिले आभाळाला निमंत्रण, त्याचं सरीवर सरी येणं’ या कवितेतून जमीन, पीक आणि पाणी यांच्यातील अतूट नात्याचे काव्यमय चित्रण त्यांनी साकारले. पाण्याच्या टंचाईची दाहकता मांडणारी ‘रानवेडी पोर’ ही कविता ऐकताना अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
कविता वाचनाबरोबरच त्यांनी शब्दांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. चांगली कविता गाता आली तर तिचे गाणे कसे बनते, हे त्यांनी उदाहरणांसह उलगडून दाखविले. कविता ऐकण्यासाठी चांगले कान आणि संवेदनशील मन आवश्यक असते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्याशी मैत्री करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी शिवराज पालव, एल. एन. पाटील, सदानंद कुंभारे तसेच शिबिरातील स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्यवाचनामुळे शिबिरातील वातावरण साहित्यिक आणि चिंतनशील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT