मुंबई

समर्थ ठाणे, सशक्त भारत संकल्पनेतून गुढीपाडवा स्वागत यात्रेचे २६ वे वर्षाचे गाजणार

CD

पाडव्याला ‘समर्थ ठाणे, सशक्त भारत’चा जयघोष
स्वागतयात्रेचे यंदा २६वे वर्ष; ५० हून अधिक चित्ररथ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रमुख उपस्थिती

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख असलेली ‘गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा’ यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरी होणार आहे. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेचे यंदा २६वे वर्ष असून ‘समर्थ ठाणे, सशक्त भारत’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी ७ वाजता यात्रेला प्रारंभ होणार आहे.

गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि स्वागताध्यक्षा डॉ. धनश्री लेले यांच्या हस्ते माल्यार्पण व मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर श्री कौपीनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान होईल. यंदाच्या यात्रेत ५० हून अधिक आकर्षक चित्ररथ सहभागी होणार असून, २५० हून अधिक महिलांची ‘बाइक रॅली’ हे विशेष आकर्षण असेल. तसेच मल्लखांब, एरियल कसरती आणि जिम्नॅस्टिकची चित्तथरारक प्रात्यक्षिके ठाणेकरांना पाहायला मिळतील. कर्नाटक महासंघातर्फे यक्षगान, हुली वेष आणि चेंडे वादन अशा पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक आणि सामाजिक संगम
केवळ मिरवणूकच नव्हे, तर सामाजिक जनजागृतीवरही यंदा भर दिला आहे. संविधानाची ७५ वर्षे आणि ‘वंदे मातरम्’ची १५० वर्षे या विषयांवर विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. मुख्य यात्रेपूर्वी रविवारी (ता. १५) ‘नृत्यधारा’ आणि कचराळी तलाव येथे ‘गोदा महाआरती’, तर बुधवारी (ता. १८) मासुंदा तलाव परिसरात भव्य दीपोत्सव साजरा केला जाईल.

ठळक वैशिष्ट्ये
चित्ररथ : ५० पेक्षा अधिक (सामाजिक व शैक्षणिक विषयांवर आधारित)
कला प्रकार : यक्षगान, मल्लखांब, कुनीता भजन, चेंडे वादन
विशेष रॅली : २५० हून अधिक महिलांचा सहभाग असलेली बाइक रॅली
प्रदर्शने : संविधान ७५ वर्षे आणि वंदे मातरम् १५० वर्षे

स्वागतयात्रेचा मार्ग
श्री कौपीनेश्वर मंदिर (प्रस्थान) - जांभळी नाका- जुना आग्रा रोड- आराधना सिनेमा- हरी निवास चौक- गोखले रोड- राममारुती मार्ग- पु. ना. गाडगीळ चौक- राम गणेश गडकरी रंगायतन (विसर्जन).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT