मुंबई

रखरखत्या उन्हात बसची प्रतीक्षा

CD

रखरखत्या उन्हात बसची प्रतीक्षा
एसटी प्रवाशांची सावलीसाठी वणवण; तापमानाचा पारा ४० अंशांवर

ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) : शहरातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचला असताना, प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या आगारांमध्ये प्रवाशांना उन्हाचे चटके सोसवे लागत आहेत. ठाणे रेल्वे स्थानक आणि वंदना एसटी आगारात प्रवाशांना सावलीसाठी मिळेल त्या आडोशाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रशासनाकडून सावलीची पुरेशी व्यवस्था नसल्याने लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे हाल होत आहेत.

ठाणे शहरात खोपट, ठाणे स्थानक आणि वंदना सिनेमा असे तीन मुख्य एसटी आगार आहेत. या आगारांतून दररोज ५० हजारहून अधिक प्रवासी राज्यभरात प्रवास करतात. यातून महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो; मात्र प्रवाशांना किमान पिण्याचे शुद्ध पाणी आणि सावली देण्यास महामंडळ अपयशी ठरले आहे. खोपट आगार वगळता इतर दोन्ही आगारांत प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णतेची तीव्रता अधिकच जाणवत असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठाणे महापालिकेकडून सिग्नलवर काही सेकंदांसाठी थांबणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी नेटचे आच्छादन (मंडप) लावले जाते. पालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे; मात्र तासनतास बसची वाट पाहणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी महामंडळ अशी साधी व्यवस्थाही करू शकत नाही का, असा संतापजनक सवाल प्रवासी विचारत आहेत. येणाऱ्या काळात उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने, महामंडळाने तातडीने आगारांमध्ये तात्पुरते मंडप किंवा सावलीची शेड उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कुठे सोय, कुठे गैरसोय?
खोपट आगार : येथे प्रवाशांसाठी पुरेशी सावली, सुसज्ज आसन व्यवस्था आणि पिण्याच्या गार पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वंदना आगार : येथून लांब पल्ल्याच्या सर्वाधिक गाड्या सुटतात. परिणामी, प्रवाशांची गर्दी मोठी असते; मात्र येथे सावलीची सोय अत्यंत तोकडी आहे.
ठाणे स्थानक आगार : येथील अवस्थाही बिकट असून प्रवासी उन्हापासून वाचण्यासाठी कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीचा शोध घेताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT