परिवहन सभापती विकास झंजाड यांचा सत्कार
श्रमिक सेनेतर्फे प्रलंबित मागण्यांचे निवेदन
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका परिवहन समितीचे नवनिर्वाचित सभापती विकास झंजाड यांचा एनएमएमटी श्रमिक सेना युनियनच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी नवी मुंबईतील जनसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाची असलेल्या परिवहन सेवेला अधिक सक्षम व प्रभावी बनविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी श्रमिक सेना युनियनच्या शिष्टमंडळाने परिवहन उपक्रमातील कायम कर्मचारी तसेच ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सभापतींना निवेदन सादर केले. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सभापती विकास झंजाड यांनी दिले.
या वेळी परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर तसेच श्रमिक सेना युनियनचे सरचिटणीस चरण जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा अधिक सक्षम होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण आवश्यक असल्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.