मुंबई

‘पीएम सूर्यघर’मध्ये महाराष्ट्र अव्वल

CD

‘पीएम सूर्यघर’मध्ये महाराष्ट्र अव्वल
एक लाख आठ हजार घरांवर सौर प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : प्रधानमंत्री (पीएम) सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी तब्बल एक लाख आठ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. या आकडेवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून, तिसऱ्या स्थानावर गुजरात आहे.

देशातील महिना ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे आणि अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पीएम सूर्यघर योजना सुरू केली आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी एक लाख आठ हजार ३२७ स्थापित सौरऊर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती ग्राहकांना छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. एक किलोवॉट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट दिले जाते. उर्वरित रक्कम लाभार्थी वीजग्राहकाने भरायची असते. एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. देशामध्ये या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी एकूण पाच लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले.

राज्यनिहाय आकडेवारी
राज्य घरांवर सौरऊर्जा प्रकल्प
महाराष्ट्र १ लाख ८ हजार
उत्तर प्रदेश ९५ हजार ६६५
गुजरात ९४ हजार ३६४
राजस्थान ३९ हजार ४८४
केरळ ३६ हजार ८३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT