मुंबई

जुन्या तिकिटे-पासची विल्हेवाट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : भाडेवाढीनंतर आताची तिकिटे वापरात येण्याची शक्यता नसल्याने साठा विभागात जागेची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कळवा आणि वागळे आगारात पडून असलेल्या जुन्या तिकिटे-पासची विल्हेवाट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार टीएमटी चार कोटी ६३ लाख तिकीटे आणि पास जाळणार आहेत.
ठाणे परिवहन सेवेच्या वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठा विभागात विविध दरांची बस तिकिटे आणि पास दीर्घकाळापासून वापरात नसल्याने पडून आहेत. यामध्ये २००७ ते २००८ या कालावधीतील एक कोटीहून अधिक तिकिटांचा समावेश आहे. २०१५मध्ये परिवहन सेवेचे भाडे वाढवल्यानंतर ही तिकिटे व पास पुढे वापरणे शक्य राहिले नाही. परिणामी, हा साठा पडून असल्याने जागेची टंचाई निर्माण झाली आहे. दीर्घकाळ पडून राहिल्याने कागदी तिकिटे खराब होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना जाळून विल्हेवाट लावण्याची परवानगी देण्याची मागणी परिवहन विभागाने केली आहे. यासंदर्भाचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला यापूर्वीच परिवहन व्यवस्थापकांनी मान्यता दिली आहे. मात्र, आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणे परिवहन सेवेने पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर तिकिटांची छपाई का केली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. परिवहन सेवेच्या साठ्यात ४ कोटी ६३ लाख ८५ हजार ५३७ तिकिटे, ७१ हजार ४०८ विविध पास, १३ हजार २०२ ओळखपत्रे आणि १४ हजार ५४५ अर्ज अशी सामग्री नष्ट करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

काय सांगते आकडेवारी
एप्रिल २००७ ते एप्रिल २००८ या कालावधीतील १ कोटी ९८ लाख ९० हजार ४७५ तिकिटे, ३१ मार्च २०१५ पूर्वी रद्द करण्यात आलेली १ कोटी ७ लाख तिकिटे, कळवा आगारातील २४ लाख ७४ हजार १००, वागळे आगारातील १ कोटी २४ लाख ८५ हजार ५००, तसेच ५५ व ९५ रुपयांच्या दरातील रद्द तिकिटे अशा मोठ्या प्रमाणातील साठ्याचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ७१ हजार विद्यार्थी सवलत आणि प्रवासी पासही नष्ट केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT