२०० महिलांची मोफत आरोग्य तपासणी
‘रिलीफ हॉस्पिटल्स’च्या उपक्रमाला उंदड प्रतिसाद
पालघर, ता. १५ ः महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने रिलीफ हॉस्पिटल्सच्या जनजागृती सप्ताहात पालघर, बोईसर येथील दोनशे महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
शिबिरात स्त्रीरोग तपासणी, मानसोपचार तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, त्वचारोग तपासणी, नाक-कान-घसा तपासणी, आयव्हीएफ व स्त्रीरोगविषयक सल्ला, फिजिशियन सल्ला तसेच हाडांच्या विकारांची तपासणी अशा विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय विविध आजारांचे निदान करून त्यावर मोफत वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमृता राऊळ, डॉ. अंकिता गौर, नेत्रतज्ज्ञ डॉ. संजना शाह, दंतचिकित्सक डॉ. श्रुती कपिल तसेच त्वचारोगतज्ज्ञ डॉ. पूजा घोलवड यांनी सहभाग घेतला.
-------------------------
शासन योजनांबाबत जनजागृती
धकाधकीच्या दैनंदिन जीवनात अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे तसेच त्यांना वेळेवर वैद्यकीय सल्ला मिळावा, या उद्देशाने आरोग्य सप्ताह भरवल्याची माहिती रिलीफ हॉस्पिटल्सचे डॉ. विशाल कोडगिरकर यांनी दिली. या उपक्रमातून गरजू व आजारी महिलांना पुढील उपचार शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.