मुंबई

नवी मुंबई महापालिकेत २५० महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

CD

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्य संवर्धन
नवी मुंबईत २५० महिलांचा कार्यशाळेत सहभाग
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० अंतर्गत नवी मुंबई शहराला कचरामुक्त करण्याच्या मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष क्षमता बांधणी व कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत २५० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून स्वच्छतेचे नवनवीन धडे गिरवले.
कचरामुक्त शहरांसाठी राष्ट्रीय क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यात आला असून, त्या अंतर्गत सर्व स्तरांवरील शासकीय संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वच्छतेविषयी क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने देशभरात २३ स्वच्छता नॉलेज पार्टनर्सची नियुक्ती केली असून, त्यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यानुसार नवी मुंबईत ही कार्यशाळा नुकतीच पार पडली.
हिमालयन इन्स्टिट्युट फॉर एन्व्हायरमेंट, इकोलॉजी अँड डेव्हलपमेंट या स्वच्छता नॉलेज पार्टनर संस्थेच्या वतीने ऑरनेट टेक्नॉलॉजिसच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सेवानिवृत्त विशेष कार्य अधिकारी आनंद जगताप आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रशिक्षक तिक्षला गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस उपआयुक्त डॉ. अजय गडदे तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर उपस्थित होते.

कौशल्यवृद्धीमुळे स्वच्छतेला बळ
महापालिकेच्या ज्ञानकेंद्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत २५० हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह संबंधित अधिकारी व तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीमुळे शहर स्वच्छतेला अधिक बळ मिळेल, असे आयुक्तांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT