मुंबई

उन्हाळ्यातही वाढतोय खोकल्याचा त्रास

CD

उन्हाळ्यातही खोकल्याचा त्रास
नवी मुंबईतील दवाखाने, रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून, त्यासोबतच बदलत्या हवामानामुळे नागरिक तापापेक्षा जास्त सर्दी आणि खोकल्याने हैराण झाले आहेत. एरवी हिवाळ्यात आढळणारे हे आजार यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जाणवत असून, खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे.
सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री तुलनेने थंड वातावरण, अशी स्थिती आहे. या विचित्र हवामानामुळे आरोग्यवर विपरीत परिणाम होत असून, सर्दी-खोकल्याचे आजार बळावत आहेत. त्यातच वाढते वायुप्रदूषण, धूलिकण आणि शहरात सुरू असलेली बांधकामे यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. हे सूक्ष्म कण श्वसनमार्गावर परिणाम करत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नवी मुंबईतील दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये मागील काही दिवसांत घसा दुखणे, खोकला आणि सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही रुग्णांमध्ये ताप नसतानाही सतत खोकला येणे, घसा खवखवणे आणि शिंका येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी
हवामानातील अचानक बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. प्रतीक तांबे यांनी दिला.

काय काळजी घ्यावी
पुरेसे पाणी पिणे, धुळीपासून बचाव करणे, मास्कचा वापर करणे आणि लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हवामानातील बदलामुळे अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन काही दिवसांत कमी होऊ शकते; मात्र दुर्लक्ष केल्यास त्रास वाढण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT