अलिबाग-तुळजापूर एसटी सुरू करण्याची मागणी
पोयनाड, ता. १५ (बातमीदार) : मार्च महिन्यापासून उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत असल्याने पर्यटक आणि भाविकांची पावले पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांकडे वळू लागली आहेत. यामुळे राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या एसटी बसना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अलिबाग आगारातून तुळजापूर येथे जाण्यासाठी थेट एसटी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवासी व भाविकांकडून होत आहे.
अलिबाग आगारातून सध्या अक्कलकोट, शिर्डी, पंढरपूर, शेगाव, भगवानगड आणि गहिनीनाथ गड या ठिकाणी थेट एसटी सेवा उपलब्ध आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या तुळजापूर तुळजाभवानी मंदिर येथे जाण्यासाठी अलिबागहून थेट एसटी नसल्याने भाविकांना पुणे किंवा सोलापूरमार्गे प्रवास करावा लागतो.
अलिबाग-तुळजापूर ही एसटी (खोपोली, पिंपरी-चिंचवड, पुणे, हडपसर, इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, बार्शी मार्गे) सुरू केल्यास पोयनाड परिसर, खारेपाट विभाग व अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील भाविकांना मोठी सुविधा होणार आहे. त्यामुळे अलिबाग आगार व पेण विभागीय कार्यालयाने या मागणीचा विचार करून ही एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.