मुंबई

"नंदनवन -सुंदर बाग "स्पर्धेच्या पारितोषिक वितरण

CD

कल्याणमध्ये ‘नंदनवन-सुंदर बाग’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : पर्यावरणाचे संवर्धन आणि शहरात हिरवाई टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘नंदनवन-सुंदर बाग’ स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभ उद्या, रविवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण पश्चिम येथील सिटी पार्क येथे पार पडला. कल्याण-डोंबिवली महापालिका उद्यान विभाग, पर्यावरण दक्षता मंडळ, एन्व्हायरो व्हिजील आणि इनरव्हील क्लब (डोंबिवली वेस्ट, ईस्ट व कल्याण रिव्हरसाईड) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या सोहळ्याला महापौर अ‍ॅड. हर्षाली विजय चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून विजेत्यांचा गौरव केला.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षारोपण आणि जोपासना करावी, या हेतूने दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षीच्या स्पर्धेसाठी २२ विविध गटांमध्ये एकूण १०४ प्रवेशिका प्राप्त झाल्या. यात शैक्षणिक संस्था, सार्वजनिक बागा, घराभोवतालच्या बागा, ओपन टेरेस, ग्रीलमधील झाडे, हँगिंग बागा आणि रस्ता दुभाजकांवरील हिरवाई यांचा यात समावेश होता. परीक्षकांनी निवडलेल्या विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. शहरातील निसर्गप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित राहून विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करावे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

विशेष आकर्षण
बक्षीस समारंभाचे औचित्य साधून सिटी पार्क परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथे अतिशय सुंदर आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचे प्रदर्शन आयोजित केले होते. पर्यावरणपूरक उत्पादनांचे स्टॉल्स आणि त्यांची विक्री करण्यात आली. बागकाम प्रेमींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT