मुंबई

हृदयाएवढा ट्यूमर काढून थ्रीडी टायटॅनियम इम्प्लांटने छातीची पुनर्रचना

CD

हृदयाएवढा ट्यूमर काढून जीवदान
थ्रीडी टायटॅनियम इम्प्लांटने छातीची पुनर्रचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईतील एका महिलेच्या छातीतील हृदयाएवढी कर्करोगाचा ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. एवढेच नव्हे, तर महिलेच्या शारीरिक रचनेनुसार थ्रीडी प्रिंटेड टायटॅनियम इम्प्लांटद्वारे छातीची पुनर्रचना करण्यात आली.
फिटनेस ट्रेनर असलेल्या ४१ वर्षीय महिलेच्या छातीत सूज दिसल्यानंतर तपासणीत तिला हाडांचा कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोगाची गाठ छातीच्या मुख्य हाडापासून इतर ठिकाणी पसरली होती. गाठ पूर्णपणे काढण्यासाठी छातीचे मुख्य हाड आणि काही बरगड्या काढाव्या लागल्या. यानंतर रुग्णासाठी खास तयार केलेले नऊ भागांचे थ्रीडी-प्रिंटेड टायटॅनियम इम्प्लांट बसवून छातीचा पिंजरा पुन्हा तयार करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्णाची प्रकृती सुधारली असून, तिला सहज श्वास घेणे आणि हालचाल करणे शक्य झाले आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. मनीष अगरवाल आणि डॉ. जॉर्ज करीमुंडकल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने केली.
-----
छातीच्या मध्यभागातील हाडाच्या गाठी होणे हे अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. कर्करोगाची गाठ थेट हृदय आणि फुप्फुसांच्या शेजारी असल्याने ती काढण्याचे काम आव्हानात्मक होते. शस्त्रक्रियेनंतर छातीची पुनर्रचना करून, रुग्णाला सामान्यपणे श्वास घेता यावा, यासाठी थ्रीडी-प्रिंटेड टायटॅनियम इम्प्लांट करण्यात आले.
- डॉ. मनीष अगरवाल, ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

"म्हणून आम्ही मुलाचा विचार केला नाही" राकेशने केला मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबाबतचा खुलासा

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : हिंगोलीच्या वसमत शहरात डिझेलचा तुटवडा, नागरिकांनी डिझेलसाठी लांबलचक रांगा

SCROLL FOR NEXT