‘महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करा’
विरार (बातमीदार)ः वसई-विरार शहराचे जाहिरात फलकांमुळे विद्रुपीकरण तसेच पालिकेची होणारी कोट्यवधींची आर्थिक फसवणूक प्रकरणात बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईची मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी शहरात जाहिरात फलकांबाबतच्या धोरणाची कोणतीही काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक खासगी कंपन्या आणि ठेकेदार महापालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवून आहेत. त्यामुळे शहराचे विद्रपीकरण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पालिका प्रशासन थकबाकीदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.