मुंबई

२५ आदिवासी जोडपी लग्नबंधनात

CD

२५ आदिवासी जोडपी लग्नबंधनात
‘रोशनी फाउंडेशन’चा उपक्रम, पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा
कासा, ता.१६ (बातमीदार)ः डहाणूच्या हळदपाडा येथे २५ आदिवासी जोडप्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्यात आला. रोशनी फाउंडेशनच्या पुढाकारातून झालेल्या उपक्रमात मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यांना शुभ आशिर्वाद दिले.
सामूहिक विवाह सोहळा आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार पार पडला. विवाहपूर्व टोकर मोड पारंपरिक विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर धवलऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विवाह विधी पार पडले. संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमादरम्यान पारंपरिक तारपा वादनाचे सूर घुमले. या सुरांवर गावकरी, पाहुणे, उपस्थितांनी ठेका धरला होता. त्यामुळे आदिवासी परंपरेचा जिवंत अनुभव उपस्थितांना मिळाला. नवविवाहित जोडप्यांना विविध उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था होती.
--------------------------------
ग्रामविकासावर भर
रोशनी फाउंडेशन अनेक वर्षांपासून डहाणू व तलासरी परिसरातील आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासासाठी कार्यरत आहे. ‘रोशनी बंधन’ हा सामूहिक विवाह सोहळा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी सन्मानाने विवाह पार पाडण्याचा महत्त्वाचा सामाजिक उपक्रम ठरत आहे. या सोहळ्यामुळे २५ नव्या कुटुंबांची सुरुवात झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य! राज्यभरातील रुग्णालयांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

SCROLL FOR NEXT