मुंबई

वाहतूक शाखेचा स्त्री शक्तीच्या धैर्याला सलाम

CD

वाहतूक शाखेचा स्त्रीशक्तीच्या धैर्याला सलाम
जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) ः महिला पोलिसांनी वाहतूक नियमनाचे अचूकपणे कर्तव्य पार पाडावे, प्रशासन त्यांच्यासोबत आहे. कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी आपल्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्रीशक्तीचा गौरव म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यरत महिलावर्ग आणि रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. १५) ठाणे शहर वाहतूक शाखा आणि मेयर व्हायबोटिक्स यांच्या वतीने कापूरबावडी येथील मंथन हॉलमध्ये हेल्मेट सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्रीशक्तीचा गौरव म्हणून महिला वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. घर सांभाळून कामात चोख कर्तव्य बजावणे, अशी दुहेरी जबाबदारी महिला पार पाडतात. त्यामुळे आरोग्याकडे त्यांच्याकडून अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब विचारात घेऊन त्यांच्याकरिता ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे व पोलिस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेयर कंपनीच्या पुढाकाराने अस्थिरोगतज्ज्ञांमार्फत बोन डेन्सिटी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या वेळी महिलांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. उपस्थित महिला पोलिस कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शिरसाट यांनी स्त्रीशक्तीच्या धैर्याला सलाम केला. तर मेयर कंपनीचे संचालक राजेश तावडे यांनी आम्ही नेहमीच स्त्रीशक्तीला प्राधान्य देत आलो आहोत, असे सांगितले.

कॅल्शियम आवश्यक
महिला दिन रोजच साजरा व्हायला हवा. समाजाचे संरक्षण तसेच समाजप्रबोधन करणाऱ्या महिला सुरक्षित व निरोगी राहव्यात यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला. नोकरदार महिलांनी तर जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. हल्लीच्या जेवणामधील न्यूट्रिशन व्हॅल्यू खालावली आहे. त्यामुळे हेल्थ सप्लीमेंट घेणे गरजेचे आहे. बाहेरच्या खाण्याने हाडे ठिसूळ होत आहेत. त्यामुळे शरीरात कॅल्शियमच्या योग्य मात्रेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मेयर व्हायबोटिक्स कंपच्या संचालिका उमा कालेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT