मुंबई

मुंबईकर गोमंतकवासियांचा शिवसेना मेळावा उत्‍साहात

CD

मुंबईकर गोमंतकवासीयांचा शिवसेना मेळावा उत्‍साहात
मुंबई, ता. १६ : पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर गोव्‍यात शिवसेना पक्षाच्‍या बांधणीसाठी मुंबईतील गोमंतकवासीयांचा मेळावा गोवा राज्‍याचे शिवसेना संपर्क नेते गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली व शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्‍या मागदर्शनाखाली रविवारी झाला.
या मेळाव्‍यात मार्गदर्शन करताना शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सज्‍ज राहण्‍याचे आवाहन उपस्थितांना केले. या निवडणुकीसाठी स्‍थानीय लोकाधिकार सेना महासंघ आणि मुंबईतील गोमंतकवासीय यांच्‍या सहयोगाने गोवा राज्‍यातील स्‍थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भूमिपूत्रांसाठी व्‍यापक चळवळ उभी करण्‍यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत व मार्गदर्शन पक्षाकडून मिळेल. शिवसेनेचे मुख्‍य नेते व्‍यक्तिश: यामध्‍ये लक्ष घालून संघटनेला ताकद देतील, असेही कीर्तिकर म्‍हणाले. या मेळाव्‍यामध्‍येच गोमंतकासाठी शिवसेना पक्षाच्‍या वतीने दक्षिण व उत्तर गोव्‍यासाठी दोन रुग्‍णवाहिकांचे लोकार्पण करण्‍यात आले.
या मेळाव्‍यास शिवसेना पक्षाचे गोवा राज्‍य संपर्कप्रमुख तथा मुंबईचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, गोवा राज्‍यप्रमुख उपेंद्र गावकर, शिवसेना विभागप्रमुख माजी नगरसेवक राजू पेडणेकर, शिवसेना विभागप्रमुख दिलीप नाईक, स्‍थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरूण मोरे, गोवा राज्‍य सचिव काशिनाथ मयेकर, दक्षिण गोवा जिल्‍हाप्रमुख गणबा नाईक-देसाई, उत्‍तर गोवा जिल्‍हाप्रमुख सुनील सांतीनेजकर, दक्षिण गोवा जिल्‍हा संपर्कप्रमुख प्रकाश पावसकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्‍तर गोवा जिल्‍हा संपर्कप्रमुख मिलिंद प्रधान यांनी केले. शिवसेनेचे मुख्‍यनेते, महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिवसेना पक्षाचा वर्षभरापूर्वीच गोव्यात प्रवेश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT