मुंबई

बदलापुरात मॅमोग्राफी तपासणी शिबिर

CD

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रिअल एरिया यांच्या वतीने चाळीशी ओलांडलेल्या महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर घेण्यात आले. स्तन कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे; तसेच महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, ५०हून अधिक महिलांनी तपासणीचा लाभ घेतला.
बदलापूर पूर्व येथील डॉ. प्रकाश राठोड यांच्या ममता हॉस्पिटलमध्ये हे शिबिर झाले. या उपक्रमासाठी डॉ. सविता जावडेकर आणि डॉ. दिलीप मानगेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. स्तन कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. शिबिरासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित पाध्ये व प्रथम महिला अक्षदा पाध्ये यांनी सर्व व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. या वेळी डॉ. योगेंद्र जावडेकर, डॉ. शकुंतला चुरी, डॉ. विद्या, तसेच क्लबचे सभासद प्रतिभा, प्रिया, श्याम, अमोल, संगीता, प्रमिला आणि सचिव संतोष यांनी सहकार्य केले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी आणि स्तन कर्करोगाचे वेळेत निदान होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT