मुंबई

एमआयडीसी स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा

CD

कंपनी व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
एमआयडीसी स्फोटप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : बदलापूर एमआयडीसीमधील ‘डी. के. फार्माकेम प्रा. लि.’ कंपनीत १२ जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; मात्र या कामगाराला स्फोटानंतर तातडीने उपचार न मिळाल्यानेच त्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप करत कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज प्रवीण गिध यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. या अर्जात त्यांनी दावा केला आहे की, स्फोटात जखमी झालेला दशरथ इवणे (२०) याला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी एका खासगी वाहनात शिरगाव कमान परिसरात सुमारे ३० ते ३५ मिनिटे तसेच ठेवण्यात आले. हा अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया गेल्यामुळे आणि प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असे गिध यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून अर्जात नमूद केले आहे. जखमी दशरथला नंतर नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे एमआयडीसीमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन?
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, रिॲक्टरमध्ये हाताने ‘टोल्युलाइन’ टाकत असताना निर्माण झालेल्या ‘स्टॅटिक चार्ज’मुळे हा स्फोट झाला. कंपनी व्यवस्थापन आपल्या सुरक्षिततेच्या नियमांमधील त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशयही निवेदनात व्यक्त केला आहे.

मागण्या काय आहेत?
स्फोटाचे नेमके कारण आणि कंपनीतील सुरक्षा यंत्रणेची तपासणी व्हावी.
रुग्णालयातील उपचारांच्या नोंदी, पोस्टमार्टम अहवाल आणि कंपनीने सांगितलेली भाजल्याची टक्केवारी यांची पडताळणी करावी.
मृत कामगार गरीब कुटुंबातील असल्याने पोलिसांनी ‘सुमोटो’ अंतर्गत दखल घेऊन कंपनी मालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

Oscars 2026 Goodie Bag: बाबो! ऑस्कर जिंकलं नाही तरी नॉमिनींना मिळाली 3.23 कोटींची बॅग, आत नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT