मुंबई

पोलिसांच्या छाप्यानंतर पुन्हा हुक्का पार्लर सुरू

CD

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : बेकायदा हुक्का पार्लर चालवल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी ८ मार्च रोजी वाशी येथील ग्रीनस्केप इमारतीमधील हाउस ऑफ लॉर्ड या रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती. मात्र, पुन्हा छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर सुरू केल्याने वाशी पोलिसांनी रविवारी (ता. १५) मध्यरात्री या रेस्टॉरंटवर पुन्हा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनास्थळावरून हुक्क्याचे साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त केला आहे.

वाशी येथील सेक्टर-३०, ग्रीनस्केप बिल्डिंगमधील हाउस ऑफ लॉर्ड या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बेकायदा हुक्का पुरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या वेळी काही ग्राहक निकोटीनयुक्त आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन वेगवेगळ्या कंपनीचे सुगंधी फ्लेवर्स, सिल्व्हर फॉईल लावलेले हुक्का पॉट आणि नळ्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाशी पोलिसांनी व्यवस्थापक कनलजित सिंग सरवन सिंग बेला (वय ३३), वेटर स्वप्नील शिंदे (वय ३२) आणि इम्रान अब्दुल हमीद हुसेन (वय २५, रा. पनवेल) व धर्मेंद्रकुमार सत्तेलाल सिंग (रा. वाशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात खाद्य व्यापार्‍यांना मोठा दिलासा! लायसन्सची सक्ती संपली; आता परवान्याशिवायही चालणार व्यवसाय

IPL 2026 : हार्दिक पांड्याच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन राहणार! संघ व्यवस्थापनाचा फुल सपोर्ट, पण दोन स्टार खेळाडूंना मिळालीय तंबी

इंडिगोच्या प्रवासी विमानात पॉवर बँकला अचानक आग, घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : आज बंगालच्या भूमीवर 'सनातन' भगवा ध्वज फडकला - त्रिपुरा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पापिया दत्ता

Purandar Airport Update : पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना ७ मे पासून पैसे वाटप; ऑक्टोबरमध्ये सुरू होणार काम

SCROLL FOR NEXT