मुंबई

डोंबिवली लाईट हाऊसचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

CD

डोंबिवलीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते यशस्वी सत्कार

कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : डोंबिवली ‘लाइट हाउस’च्या वतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात लाइट हाउसअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रांत नोकरी मिळवलेल्या १८० हून अधिक विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर राहुल दामले उपस्थित होते. या वेळी त्यांनी नोकरीत सातत्य राखणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविले.

आपल्या भाषणात उपमहापौर राहुल दामले म्हणाले की, ‘लाइट हाउस नावाप्रमाणेच दिशा हरवलेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. महापालिका आणि लाइट हाउसच्या संयुक्त उपक्रमामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या वेळी क्लस्टर हेड नीलेश पाटील यांनी या वेळी उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा मांडला. आतापर्यंत सुमारे ४,५०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी २,००० हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. ‘वेल्स फार्गो’ कंपनीने सीएसआर फंडातून या उपक्रमाला मोलाची मदत केली आहे. केडीएमसी कार्यक्षेत्रात सध्या आंबिवली आणि डोंबिवली अशा दोन ठिकाणी ही केंद्रे यशस्वीपणे कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाइट हाउसच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सोहळ्याला भाजप गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार हळबे, रंजना पेणकर, शारदा चौधरी, तसेच हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादू सिंग महेर आणि संजय माने उपस्थित होते. मान्यवरांनी महापालिकेच्या वतीने या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा... स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; म्हणते-

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

Oscars 2026 Goodie Bag: बाबो! ऑस्कर जिंकलं नाही तरी नॉमिनींना मिळाली 3.23 कोटींची बॅग, आत नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT