मुंबई

मृणालताई गोरे विस्तारित पुलाची कोटीची उड्डाणे

CD

मृणालताई गोरे विस्तारित पुलाची कोटींची उड्डाणे
प्रकल्पाचा खर्च २०९ कोटींवरून २४८ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे जाळे विस्तारले जात आहे. गोरेगाव येथील मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिमेपर्यंतच्या रिलीफ रोडपर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला आहे. २०९ कोटी रुपयांवरून हा खर्च २४८ कोटींवर पोहोचला आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर ३० एप्रिलपर्यंत या पुलाची कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.

महापालिकेच्या पूल विभागामार्फत या विस्तारित पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८मध्ये मंजुरी मिळाली, तर २२ मार्च २०१९मध्ये या कामाला सुरुवात झाली. या कामासाठी एमईपीएल-ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता. पुढे कोरोनामुळे काम थांबले आणि पुढे २०२३मध्ये याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह २०९ कोटींवरून हा खर्च २४८ कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. मृणाल गोरे रेल्वे उड्डाणपुलाचा मुख्य पूल २०१६मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३९० मीटर लांबीचा ‘आर्म’ पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


८० टक्के काम पूर्ण
महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी व अतिरिक्त कामांची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी घेऊन कंत्राट रकमेत सुधारणा करण्यात आली असून, कामाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT