मुंबई

चरस तस्करीत ‘महिला कनेक्शन’ उघड

CD

अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये सव्वा चार कोटी रुपयांच्या चरस जप्ती प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत उल्हासनगर येथील कुख्यात महिला तस्कर शहनाज शेख हिला अटक केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून तिचे नाव समोर आले होते. या प्रकरणात ‘महिला कनेक्शन’ उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पश्चिम परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून पाच किलो ३०० ग्रॅम चरस जप्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चरसची किंमत सुमारे चार कोटी २५ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला १९ वर्षीय मुख्य आरोपी हर्षल पटेल आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती. या आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीत शहनाज शेख हिच्या सहभागाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उल्हासनगरमधून तिला ताब्यात घेत अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या शेख हिच्यावर यापूर्वी ‘एमपीडीए’अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील तिची नेमकी भूमिका, तसेच अमली पदार्थ तस्करीचे जाळे आणखी कोणापर्यंत पसरले आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

Robot Monk for the first time : रोबोट बनला संत, अध्यात्मिक मार्गावर चालण्याची घेतली शपथ; जपमाळेचा जप अन्... Video Viral

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Vasai Virar Politics: वसई-विरार महापालिकेच्या महिला-बालकल्याण व आरोग्य समित्यांवर बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत

IPL 2026 : हार्दिक पांड्याने रायपूरसाठी विमान पकडलं! पण, त्याला खेळवायचं की नाही, याचा Mumbai Indians करतेच विचार; कारण काय?

SCROLL FOR NEXT